HW Marathi
Uncategorized देश / विदेश राजकारण

#PulwamaAttack : हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला ?, राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्याला आज (१४ फेब्रुवारी) वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरतून हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यावर तीन प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हणाले की, आज आपण पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफच्या ४० शहीद जवानांना आठवतो, यावेळी मी तुम्हा सर्वा काही प्रश्न विचारतो. १. या हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला ? , २. या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झाले? ३. पुलवामा हल्ला ज्या चुकांमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजप सरकारमधील कुणाला जबाबदार धरण्यात आले?”

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी संताप व्यक्त ट्वीट करत राहुल गांधीवर टीका केली. कपिल मिश्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, लाज वाटू त्या राहुल गांधी,  तुम्ही काय विचार की पुलवामा हल्ल्याचा कोणाला फायदा झाला, असा प्रश्न विचारु कसे शकता ?, इंदिरा गांधी-राजीव गांधी यांच्या हत्येचा फायदा कुणाला झाला? असं देशाने विचारलं, तर काय उत्तर देणार? एवढे घाणेरडे राजकारण करु नका. लाज ठेवा,”

 

 

 

 

 

Related posts

टिपू सुल्तान जयंतीवरुन बेळगावात दोन गट भिडले, जमावाच्या दगडफेकीत पोलीस आयुक्त जखमी

News Desk

आसामची सत्ता आरएसएसचे चड्डीवाले नाही चालविणार !

News Desk

नवमतदारांनो ! मतदानाला जाताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

News Desk