HW News Marathi
Uncategorized

संजय राऊत सपत्नीक शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर!

मुंबई। शिवसेना नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत सपत्नीक पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. या भेटीचे नेमके कारण काय? यावर चर्चा सुरू आहे.

संजय राऊत – शरद पवार यांच्यामध्ये बैठक

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवरदिवाळीच्या काळात शरद पवार आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय बारामतीला होते. त्यामुळे या काळात राऊतांना प्रत्यक्ष भेटता आले नाही. पवार आता मुंबईत आलेले आहेत. आज अगदी सकाळी 9 च्या आसपास संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत – शरद पवार यांच्यामध्ये बैठक एक चर्चेचा विषय समजला जात आहे. या भेटीचे कारण शरद पवार आणि कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून राऊत दीपावलीच्या शुभेच्छा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या मुलीचं लग्न येत्या काही दिवसात आहे. त्याचे आमंत्रण द्यायला संजय राऊत सपत्नीक गेले असल्याचे समजते. तसेच राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘दो कौडी के लोग’, नेमका कुणाला टोला?

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु असतानाच आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उस जगह हमेशा, खामोश रहा करो जहाँ, दो कौडी के लोग, अपना गुण गाते होते हो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘दो कौडी के लोग’, असा टोला नेमका कोणाला हाणला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्राचाळ प्रकरणात मोहित कंबोज यांच्यावर सुनील राऊतांचा गंभीर आरोप

News Desk

Sharad Pawar | देशात परिवर्तनासाठी अनकूल वातावरण !

News Desk

संभाजीराजे छत्रपतींना भाजपनं संधी नाकारली? राज्यसभेत संजय राऊत भिडले!

News Desk