HW News Marathi
Uncategorized

चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी शाळेच्या विश्वस्ताला अटक

अँधेरीतील इंटरनॅश्नल शाळेतील चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकऱणी शाळेच्या विश्वस्ताल पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिलंट पॅट्रिक जॅकी हेन्री मॉरीस (५७) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा फ्रान्सचा नागरिक आहे. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 नोव्हेंबरपर्यत पोलिस कोटडी सुनावली आहे.

अंधेरी परिसरात ४ वर्षांची मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. मॉरीसच्या शाळेत ती शिक्षण घेत आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी १८ मे रोजी मॉरीसविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेल्या वर्षी ऑक्टंबर महिन्यात मॉरीसने मुलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीच्या अंगावर आढळून आलेल्या खुणांमुळे पालकांनी तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा मुलीने मॉरीसने तिच्यासोब अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. सामाजिक संस्थेमार्फत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर कायदेशीर बाबी समजून त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार नोंदविली. एमआयडीसी पोलिसांनी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून मॉरीसचा शोध सुरू केला. मात्र तो फ्रान्सला निघून गेल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण जात होते. अखेर मंगळवारी पोलिसांनी अटक करून दिंडोशी सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास मेघवाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस आयुक्त करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant patil Vs Balasaheb Thorat | भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली..

Arati More

ग्रामीण भागातही एनसीसीची विस्तार-सुभाष भामरे

News Desk

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

News Desk