HW News Marathi
Uncategorized

महाविकासआघाडीच्या खातेवाटपाबाबत शरद पवार म्हणतात…!

अहमदनगर | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा नुकताच पार पडला. महाविकासआघाडीच्या २६ कॅबिनेट आणि १० मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप महाविकासआघाडीचे खातेवाटप झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस खातेवाटपावर नारज असल्यामुळे चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीचे नेते खातेवाटपावर नाराज असल्याच्या सर्व चर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत. “खातेवाटपाबद्दल कुठलीही नाराजी नाही, आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी माध्यमांशी बोलता दिली.

शरद पवार म्हणाले की, “‘मंत्रिपद मिळाले नाही म्हणून पक्षात कोणीही नाराज नसून गृहमंत्री आमच्याकडे नको असे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या महाविकासआघाडीच्या खातेवाटपात तरुणांना जास्त संधी देण्यात आली आहे. खातेवाटपाबद्दल कुठलीही नाराजी नाही, आज किंवा उद्या खातेवाटप होईल. इतकेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पर्यंत खातेवाटप जाहीर करतील, असे स्पष्ट संकेत पवारांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत दिले होते. पवार हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते,” त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात पुन्हा गारपिटीची शक्यता

swarit

राज्यात १० हजारहून अधिक मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती

News Desk

रोहित पवारांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?

News Desk