HW Marathi
Uncategorized देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

राष्ट्रवादीच्या खासदारांनो दिल्लीला जाऊ नका ,शरद पवारांची सुचना

मुंबई | देशभरात कोरोनाचा हाहाःकार वाढतो आहे,सरकारने त्या दृष्टीने पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. ३१ मार्चपर्यंत ३ राज्य लाॅकडाऊन करण्यात आली आहेत तर भारतीय रेल्वेसुद्धा बंद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खासदारांना सूचना दिल्या आहेत. शरद पवारसुद्धा शासनाचा आदेश पाळत वर्क फ्राॅम होम करत आहेत .पवारांनी ट्विट करत राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिल्लीला परत जाऊ नये अशा सुचना केल्या आहेत

संकट गंभीर असले तरीही सरकार खंभीर आहे, असा धीर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला दिला आहे. राज्यात आज (२२ मार्च) मध्य रात्रीपासून नाईलाजाने १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमत्र्यांनी केली. या काळात ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कालपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्के होती.आजपासुन फक्त ५ टक्के सरकारी कर्मचारी काम करणार आहेत

Related posts

सरकारला चौकशीचा अधिकार नाही, एसआयटी करणार चौकशी

Gauri Tilekar

…म्हणून केजरीवालयांच्या निवासस्थानी पोलिसांचा छापा

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण । तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

News Desk