HW News Marathi
Uncategorized

शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार

मुंबई। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. पवार यांनी या संदर्भातील माहिती त्यांनी २५ सप्टेंबर ला आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर कुठल्याही प्रकारची गर्दी करु नका, असे आवाहन पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे. ईडीने कार्यालयाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पवारांच्या मुंबईमधील घरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, पवारांचा नातू रोहित पवार आदी राष्ट्रवादीचे नेते मंडळी त्यांच्या निलासस्थानी दाखल झाले आहे.

नोटीस बजावली नसतानाही पवार ईडीच्या मुंबई कार्यलयात जणार आहे. यामुळे ईडी पवारांची चौकशी करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईडी कार्यालयाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले पवारांनी केले असले तरी राष्ट्रवादीच्या मुंबई येथील कार्यलायबाहेर कार्यकर्त्यां जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गळीत हंगामाला सुरुवात, दीडशे कारखान्यांना परवाना

News Desk

पन्नास हजारात खरेदी केलेल्या तरूणीवर बाबाचा आठ महिने बलात्कार

News Desk

पोलिस अधिका-याच्या मुलीवर तीन तास बलात्कार

News Desk