HW News Marathi
Uncategorized

पोलिस अधिका-याच्या मुलीवर तीन तास बलात्कार

भोपाळ: एका पोलीस उपनिरीक्षकाच्या १९ वर्षांच्या मुलीवर चौघांनी सलग तीन तास बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पीडित तरुणीचे वडील पोलीस उपनिरीक्षक तर आई गुन्हे अन्वेषण विभागात नोकरी करते. ही तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. ती मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास क्लासवरून घरी परतत होती. त्यावेळी आरोपी गोलू बिहारी चाधर याने तिचा हात पकडला. तिने प्रतिकार करत लाथ मारली आणि त्याला ढकलून दिले. चिडलेल्या गोलूने अमर घुंटू या साथीदाराला बोलावले. दोघांनी तिला पकडून रेल्वेरुळालगतच्या नाल्याकडे फरफटत नेले. त्यांनी तिला जबर मारहाण केली आणि रेल्वेरुळालगतच्या पुलाखाली नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गुटखा आणि सिगारेट आणण्यासाठी गोलू निघून गेला. तर अमर तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी थांबला. गोलूने येताना राजेश आणि रमेश या आपल्या दोन मित्रांना सोबत आणले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. हे चौघेही गुटखा, सिगरेट आणि चहासाठी ब्रेक घेत होते आणि तिच्यावर अत्याचार करत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाबाधित ७२२ जणांना डिस्जार्ज, एकूण रुग्ण संख्या ५२१८

News Desk

जगानेही मान्य केले भारतातील मोदींचे नेतृत्व, अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा

swarit

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक एक दहशतवादी ठार

News Desk