HW News Marathi
Uncategorized

शशिकलाची 1400 कोटींची संपत्ती जप्त

चेन्नईः ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या (एआयएडीएमके) नेत्या व्हीके शशिकला यांच्या कुटुंबीयांच्या विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 1400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला सध्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी बंगळुरूच्या तुरूंगात कैद आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये शशिकला यांच्याशी संबंधित आणि जया टीव्हीच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात बेनामी संपत्ती बाबत माहिती समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या मते, या छाप्यादरम्यान १४०० कोटी रूपयांहून अधिक अघोषित उत्पन्नाचा पर्दाफाश झाला आहे. या छाप्यामध्ये काय-काय दस्तऐवज आणि वस्तू मिळाल्या याबाबत अधिकृतरित्या काही सांगण्यात आलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raut यांच्या कारवाईनंतर पत्राचाळ मधील लोकांच्या प्रतिक्रिया

Seema Adhe

कल्याणमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची महिलेला मारहाण, CCTV

News Desk

मोदी लाटेत देशभरात १० मुख्यमंत्र्यांचा दारूण पराभव

News Desk