HW News Marathi
Uncategorized

पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला !

मुंबई | पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे. इस्लामाबादेत भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी घातलेला गोंधळ असह्य आहे. इस्लामाबाद येथे शनिवारी संध्याकाळी ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. निमंत्रित पाहुण्यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच रोखले. अनेकांना धमकावून परत पाठवले. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचलीच आहे, पण शेपूट अजूनही वळवळत आहे. त्या शेपटाचाही बंदोबस्त आता करावा लागेल. पुलवामा हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने घेतला. पाकडय़ांच्या घरात घुसून अतिरेकी मारले, त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून पाकिस्तान तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत होते.

दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर भारत सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत कश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघडय़ा घातल्या होत्या. भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त दिल्लीत बोलावून शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, पण इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी असे काहीच केले नव्हते. म्हणूनच आम्ही म्हणतो, पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला. सरकारने हा तमाशा विसरू नये. सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी भारताने पाकिस्तानमध्ये आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी पाहुण्यांसोबत त्यांनी केलेले गैरवर्तनावरुन पाकवर टीकास्त्र सोडले आहे.

 

 

सामनाचा आजचा अग्रलेख

पाकिस्तानला नेतृत्व नाही, दिशा नाही म्हणून इस्लामाबादला शनिवारी घडले तसे प्रकार घडतात. दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर हिंदुस्थान सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत कश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघडय़ा घातल्या होत्या. हिंदुस्थानच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, पण इस्लामाबादमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी असे काहीच केले नव्हते. म्हणूनच आम्ही म्हणतो, पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला. सरकारने हा तमाशा विसरू नये.

पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे. इस्लामाबादेत हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी घातलेला गोंधळ असह्य आहे. इस्लामाबाद येथे शनिवारी संध्याकाळी ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. निमंत्रित पाहुण्यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच रोखले. अनेकांना धमकावून परत पाठवले. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचलीच आहे, पण शेपूट अजूनही वळवळत आहे. त्या शेपटाचाही बंदोबस्त आता करावा लागेल. पुलवामा हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने घेतला. पाकडय़ांच्या घरात घुसून अतिरेकी मारले, त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून पाकिस्तान तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत होते. त्यात हिंदुस्थानच्या राजनैतिक यंत्रणेने जोर लावून मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. हे फुटके थोबाड घेऊन पाकडय़ांना जगासमोर येणे कठीणच झाले होते. त्यात मोदी सरकार पुन्हा भरघोस बहुमताने सत्तेवर आले. या धक्क्यातून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान सावरणे कठीण आहे. इम्रान यांनी मोदी यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, तसेच दोन देशांनी मिळून

विकास आणि शांततेवर काम

करावे अशी भावनाही म्हणे त्यांनी व्यक्त केली. मात्र प्रत्यक्षात शनिवारी इस्लामाबादेतील इफ्तार पार्टीप्रसंगी जे घडवले गेले ते शांतता प्रक्रियेसाठी टाकलेले पाऊल मानावे काय? पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले आहे. पाकिस्तान कोणतीही चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही. हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस जे निमंत्रित होते ते सर्व इस्लामाबादमधील ‘जानेमाने’ लोक होते. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत, कलावंत व प्रशासकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. मुख्य म्हणजे हे सर्व पाक नागरिक होते. या इफ्तार पार्टीस मसूद अजहरछाप लोकांना बोलावले नाही याचा संताप बहुधा पाकला आला असावा. या सर्व निमंत्रितांना हॉटेलात शिरण्यापासून रोखले गेले. इतकेच नाही, तर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने त्यांची झडती घेण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाने कार्यक्रमस्थळी घेराव घातला व प्रत्येक निमंत्रितास तो जणू दहशतवादीच आहे अशा पद्धतीचे वर्तन केले गेले. पाकिस्तानात जे खरे दहशतवादी आहेत ते यांचे लाडके. त्यांच्या बाबतीत पाकचे दहशतवादविरोधी पथक कमालीचे नरम असते, पण हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित इफ्तार पार्टीबाबत मात्र ते भलतेच गरम दिसले. पठाणकोट हल्ला, उरीचा हल्ला व पुलवामा हल्ल्याचे धागेदोरे पाकमध्ये पोसलेल्या दहशतवाद्यांकडे असल्याचे पुरावे देऊनही नवाज शरीफ ते इम्रान खान यांच्यापैकी कोणीच ठोस कारवाई केली नाही.

तिथे शेपूट घालायचे

इथे स्वतःच्या गल्लीत मरतुकडय़ा कुत्र्यासारखे भुंकायचे. पठाणकोट हल्ल्यानंतर दोन देशांतील सर्व चर्चा आणि व्यवहार बंद आहेत, व्यापार बंद आहे. खेळ व सांस्कृतिक संबंध तुटले आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत चीनही आज कुंपणावर आहे हे अजहर मसूद प्रकरणात दिसून आले. कर्जाच्या डोंगराखाली पाकिस्तान चिरडून गेला आहे व दहशतवाद्यांच्या नंग्या नाचामुळे तिथे एक प्रकारे अराजक निर्माण झाले आहे. पाकिस्तान हा देश नसून जागतिक दहशतवादाची ‘फॅक्टरी’ बनली आहे. आयएसआय व पाकिस्तानी लष्कर मिळून पाकिस्तानवर नियंत्रण ठेवत आहेत. इम्रान खान हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान आहेत हा भ्रम आहे. पाकिस्तानला नेतृत्व नाही, दिशा नाही म्हणून इस्लामाबादला शनिवारी घडले तसे प्रकार घडतात. दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर हिंदुस्थान सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत कश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघडय़ा घातल्या होत्या. हिंदुस्थानच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त दिल्लीत बोलावून शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, पण इस्लामाबादमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी असे काहीच केले नव्हते. म्हणूनच आम्ही म्हणतो, पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला. सरकारने हा तमाशा विसरू नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांच्या जावयाशी संबंधित दोघांना समन्स, एनसीबी SIT टीम करणार चौकशी

News Desk

इस्त्रोच्या ‘चांद्रयान – २’ने काढला चंद्रा पहिला फोटो

News Desk

स्पॅनिश अभिनेत्री राहुलच्या प्रेमात

News Desk