HW News Marathi
Uncategorized

राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज (६ एप्रिल) दिले आहेत.

कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ म्हणाले की सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबरभुजबळ म्हणाले की पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने “ब्रेक दि चेन” या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे असे आवाहन देखील मंत्री भुजबळ यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी,सहा मराठी चित्रपटांची निवड

News Desk

आता सेल्फी विथ काऊ

News Desk

“महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट फक्त बाळासाहेब ठाकरे” – Deepak Kesarkar

News Desk