HW News Marathi
Uncategorized

धक्कादायक: बापच करत होता दोन मुलींवर बलात्कार

मुंबई घाटकोपर परिसरात राहणा-या दोन मुलीवर स्वताच्या बापानेच तीन वर्षापासून आळीपाळीने अत्याचार करत असल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाच्या नावाला काळीमा फासणारी ही घटना घाटकोपरमध्ये समोर आल्यावर एकच खळबळ उडाली . याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे.

गेल्या तीन वर्षापासून दोन मुलीवर बापाने अत्याचार करत होता. या दोन्ही मुलींना घरात डांबून ठेवत होता. आणि दोघांवर आळीपाळीने अत्याचार करत होता. या अत्याचाराला कंटाळून धाकट्या मुलीने घर सोडून निघून गेली. बापाने ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी तिचा शोध घेवून बुधवारी पोलिस स्टेशनला आणले आणि तिच्या बापाला फोन करून मुलगी सापडल्याची माहिती दिली. हे ऐकून मुलीने रडू लागली. पुन्हा नराधम बापाकडे जाव लागेल या भीतीने घाबरली. पोलिसांनी जेव्हा तिला विश्वासत घून विचारपुस केले तोव्हा नराधम बापाच्या अत्याचारालाच कंटाळून मी घर सोडले असे सांगत सर्व हकीकत पोलिसांनी सांगितली. विशेष म्हणजे नराधम बापाच्या अत्याचाराला वाचा फुटूनही दोघींच्या बाजूने कोणीही उभे रहिले नाही. अखेर पंतनगर पोलिसांनीच फिर्यादी बनून वडिलांविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचार, मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल केला. ३७ वर्षांच्या बापाला अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वच्छ प्रसाधनासाठी जनजागृती रॅली

News Desk

काश्मीर प्रश्न कॉँग्रेस बोलतोय पाकिस्तानची भाषा

News Desk

बिल्डर डीएसकेंची अटक अटळ

News Desk