मुंबई | गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राज्यांचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वारंवार एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून देखील आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर एसटीकडून रोजंदारी कामगारांना काल (१९ नोव्हेंबर) २३८ निलंबित केले आहे. यानंतर एसटीकडून आज (२० नोव्हेंबर) रत्नागिरीतील ८६ रोजंदारी सेवेतील कर्मचाऱ्यांचं निलंबन केले आहे.
एसटी महामंडळाकडून २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्या २ हजार ७७६ ऐवढी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीमध्ये ४ हजार ३३९ एकूण संख्या आहे. यापैकी २४९ कर्मचारी हे रोजंदारीवर काम करतात. तर रोजंदारीवर काम करणाऱ्या २४९ पैकी ८६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच बाकीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.
एसटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. एसटीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करावा, या रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘क’ वर्गाचा दर्जा देण्यात यावा. तसेच एसटी रोजंदारी काम करणाऱ्यांना कर्मचारी महाभागई भत्ता, घरभाडे आणि वेतनात वाढ करावी, या विविध मागण्यासाठी ते देखील एसटी कर्मचाऱ्यांसोबत संपावर गेले आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मागण्य होणार नाही. तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे.
एसटीचं खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही | परब
“एसटीचं खासगीकरण करण्याचा आमचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही,” असे म्हणत परबांनी खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. तसेच आम्ही वेगवेगळ्या पर्यायांचा काय वापर करू शकतो, यावर चर्चा सुरू आहे. एसटीचं उत्पन्न कसे वाढवायचं यावर चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काल (१९ नोव्हेंबर) तोडगा निघालेला नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.