HW News Marathi
Uncategorized

डिप्टी कमिश्नरने नगरसेविकांच्या ग्रुपवर टाकले अश्लील फोटो

दिल्लीतील शाहदरा विभगाचे डेप्टी कमिश्नर अतीक अहमद यांनी शनिवारी रात्री 12 वाजता नगर सेवकांच्या ग्रुपवर अश्लील फोटो पाटवले. यामुळे डेप्टी कमिश्नर अडचणीत आले आहेत. ज्या ग्रुपवर अश्लील फोटो पाठवले त्या ग्रुपमध्ये 12 नगरसेविका आहेत. याप्रकरणी नगरसेविका गुंजन गुप्ता यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

अतीक अहमदने वार्डस कमिटी या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला आहे. त्यात 50 सदस्या आहेत. त्यपैकी 12 नगरसेविका आणि अधिकारी आहेत. नगरसेविका गुंजन यांच्या तक्रारीनंतर आनंद विहार पोलिस ठाण्यातील पोलिसांनी चौकशी सुरु केली. नगरसेविकेकडे ग्रुपमधील फोटो मागितले आहेत. हिमांशी पांडे यांनी सुद्धा शकरपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

-याप्रकऱणी डेप्टी कमिश्नर अतीक अहमद यांनी सांगितले की, मला कोणीतरी ही पोस्ट पाठवली होती ते मी डिलीट करत असताना माझा मोबाइल हॅंग झाला होता नंतर हे फोटो त्या ग्रुपवर कसे सेंड झाले माला कळाले नाही. मी सर्व ग्रुप सदस्यांची माफी मागितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मेट्रो’ ३ च्या संचालक अश्विनी भिडेंना राज्याच्या प्रधान सचिवपदी पदोन्नती

News Desk

पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला !

News Desk

२०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती बनविणार | संजय राऊत

News Desk