HW News Marathi
Uncategorized

वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी मुलीने केला यकृतदान

मुंबई जगदीश पटेल (५०) यांचे काविळमुळे यकृत पुर्णपणे निकामी झालं होतं. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरानी पटेल यांच्या घरच्याना सांगितले. यानंतर जगदीश पटेल यांची मुलगी नेहाने वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी स्व:ताची यकृत देण्याची तयारी दाखवली.

त्यानुसार मुलीने यकृताचा ६० टक्के दान केलेला भाग वडिलांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आला. काविळ झाल्याने वडिलांचे यकृत निकामी झाले होते. यकृत प्रत्यारोपण हा त्यांचे प्राण वाचविण्याचा अखेरचा मार्ग होता. त्यामुळे यकृतदानाच्या प्रतीक्षा यादीवर नाव नोंदवले नाही. कारण अधिक वेळ लावला असता तर वडिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी मी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला.” अशी माहिती नेहा पटेल यांनी दिली.

ग्लोबल रुग्णालयात ३१ ऑगस्टला ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. ६० टक्के यकृत वडिलांना दान केल्याने त्यांचे प्राण वाचवता आले. नेहा यांना आठवड्याभरात डिस्चार्ज देण्यात आला. पण वडिलांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : राष्ट्रपतींनी आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळला, फाशीचा मार्ग मोकळा

swarit

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचं मोठं विधान, शिवसेना काँग्रेसच्या वाटेवर!

News Desk

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट विभागाची यादी

News Desk