HW News Marathi
Uncategorized

मंत्र्यांच्या ‘आधार’ कार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे नाही

मुंबई – 125 कोटी भारतीयांना आधारकार्ड अनिवार्य करत ती माहिती सर्व सुविधासाठी जोडण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयाकडे त्यांच्याच मंत्र्यांची आधारकार्डची माहिती नसल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. एकप्रकारे सर्व मंत्र्यांनी मोदी यांच्या आवाहनास ठेंगाच दाखविला आहे, असे गलगली यांनी सांगितले.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे भारताचे पंतप्रधानां सहित मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी आपल्या ‘आधार’ कार्डची माहिती सादर केली असल्यास त्या मंत्र्यांच्या नावाची यादी मागितली होती. अनिल गलगली यांचा अर्ज मंत्रिमंडळ सचिवालय, लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण अश्या 5 स्थानी हस्तांतरित केला गेला. स्वतः पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या ‘आधार’ कार्डची माहिती केंद्रीय शासनाकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे मंत्र्यांची ‘आधार’ कार्ड माहिती नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाहनाकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याचे गलगली यांनी स्पष्ट केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाळ्या वाजवून, मेणबत्या लावून कोरोना जाणार नाही

News Desk

स्वच्छ प्रसाधनासाठी जनजागृती रॅली

News Desk

आम्ही छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचे वंशज,औरंगजेबाचे नाही ! औरंगाबादचं संभाजीनगर करणार ..

Arati More