HW News Marathi
Uncategorized मुंबई

मुंबईमधील वाडिया रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आग

मुंबई | मुंबईतील वाडिया रुग्णालयात (Wadia Hospital) आग लागल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी 8 अग्निशमन दलाच्या (fire brigade) गाड्या तर 6 टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुग्णालयात आज (5 ऑगस्) सायंकाळी 7 वाजतच्या सुमारास लागील.  या आगीत किती जण जखमी झाले याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील बंद असलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये आग लागली.

रुग्णालयात लागलेली आग ही लेव्हल दोनची आग आहे. या आगीत कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वाडिया रुग्णालय हे लहान मुलांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच लहान बाळांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. शॉर्ट सक्रिटमुळे रुग्णालयाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील काही भाग पुर्णपेणे सील करण्याचा महापालिकेचा निर्णय

News Desk

शनिवार ठरला अपघातवार एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार..

Adil

लोकसभेत आठवलेंना विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्धार

swarit