HW News Marathi
Uncategorized

महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर थोरात उपमुख्यमंत्री ?

मुंबई | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र, राज्यात महाविकासआघाडीची औपचारिक घोषणा उद्या (२२ नोव्हेंबर) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदी चर्चा सुरू आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद तर ५ वर्ष काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पदा मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहबे थोरात यांचे नावावर चर्चा रंगल्या आहेत.

विधासभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांनी निवडणुकीत काँग्रेसच्या ४४ आमदार निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीव थोरात यांना पक्षाकडून उपमुख्यमंत्री पदापाच्या शर्यती त्यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी यापूर्वी राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळेच या दोन दिग्गज नेत्यांशिवाय उपमुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब थोरातांच्या नावाला पसंती देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ ; करणी सेनेची धमकी

News Desk

ठाण्यात ‘पद्मावती’ चित्रपटाचा निषेध

News Desk

आमदार नितेश राणेंना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

News Desk