HW News Marathi
Uncategorized

“बंगालची वाघीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, बनर्जींचा अनुभव पवारांच्या उंचीचा!” – राऊत

मुंबई | “बंगालची वाघीण ममता बनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ममता मुंबईत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्वाची आहेत. कारण ममता बनर्जी यांना शरद पवार यांच्या उंचीचा अनुभव आहे,” असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. बनर्जी या आज (१ डिसेंबर) शरद पवार यांची भेटीवर राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या आहेत.

“आज एकही नेता आपल्या देशात नाही. ममता दीदींचा अनुभव दाडगा आहे. जर ममता दीदी जर शरद पवारांना भेटत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतोय,” असेही राऊत म्हणाले. तसेच “बंगालमध्ये काँग्रेस तिथे नाहीये ममता दीदी मुळच्या काँग्रेसच्या आहेत. त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या आहेत. तरही आम्हाला वाटते, की एक समर्थ अशी आघाडी उभी करायची आहे, असे शरद पवार यांचे मत आहे. आपल्या सर्वांना एकत्र भाजपच्या विरुद्ध लढवायचे आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती लवकरात लवकर बरे व्हावे आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांनी सक्रीय व्हावे, यासाठी त्यांनी प्रर्थना केल्याची बॅनर्जींनी भेटी दरम्यान सांगितल्याचे राऊत म्हणाले.”

बनर्जींनी बंगालमध्ये भाजपची हवा काढली

ममता यांनी काँग्रेसपासून दुरावल्या आहेत, पत्रकारांचा राऊत म्हणाले, “हा त्यांचा पश्चिम बंगालचा राजकीय विषय आहेत. बंगालमध्ये डावेही भुईसपाट झाले आहेत. आणि बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संपले असून इतर कोणतेही पक्ष राहिलेले नाहीत. शेवटी भाजपचे पथक बंगालमध्ये वाजत गाजत आले होते. मात्र, या बेडबाजाची ममता दीदींनी त्यांची हवा काढून घेतली. जे भाजपचे लोक तेथे निवडून आलेत. ते सुद्धा फुटून बरेच लोक पुन्हा परत ममता दीदींच्या पक्षात गेले आहेत. तसेच बंगालमध्ये काँग्रेस तिथे नाहीये ममता दीदी मुळच्या काँग्रेसच्या आहेत. त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या आहेत. तरही आम्हाला वाटते, की एक समर्थ अशी आघाडी उभी करायची आहे,असे शरद पवार यांचे मत आहे. आपल्या सर्वांना एकत्र घेऊनच जावे लागेल.

बनर्जींनी दिले गिफ्ट

“बॅनर्जी यांचा दौरा शासकीय कामासाठी असला. जेव्हा त्या मुंबईत येतात. तेव्हा त्या नेहमी ठाकरे कुटुंबातील प्रमुख व्यक्तींची त्या भेट घेतात. मागच्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आम्ही ही त्यांची कोलकत्तामध्ये जावून भेट असतो. ममतांनी काल (३० नोव्हेंबर) आदित्या ठाकरे यांनी ममताजींचे स्वागत केले. ममताजींनी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा होती. परंतु रुग्णालयातील बायो बबलमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही. मुख्यमंत्र्यांनी बनर्जींना भेट वस्तू दिल्या आहेत. तसेच बनर्जींनी देखील आदित्य ठाकरेंना रविंद्रनाथ टागोर आणि छत्रपती शिवाजी महाराज फ्रेम भेट दिली. आणि दोघांमध्ये राजकी चर्चा झाल्या आहेत. ममता यांनी सांगितले की ते आल्याबरोबर त्यांनी सिद्धविनायकचे दर्शन घेतले. उद्धव यांची प्रकृती लवकरात लवकर बरे व्हावे आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांनी सक्रीय व्हावे यासाठी त्यांनी प्रर्थना घेल्याचे त्यांनी सांगितले.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होणार

swarit

NGMF निधी वाटपावरून काँग्रेस गोवा प्रमुखांने मुख्यमंत्री सावंतांवर लावले आरोप

News Desk

“Parambir Singh जातील कुठे? देशातच असतील, राज्य सरकारची जबाबदारी”- Raosaheb Danve

News Desk