HW News Marathi
Uncategorized

देशात ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं?, भास्कर जाधवांनी केली मोदींची मिमिक्री

मुंबई। शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत महागाईवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. २०१४ साली या देशात निवडणुका असताना मागील ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं आहे का? असे वाक्य मोदींच्या शैलीत भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच देशातील महागाईवरुन मोदी सरकारवर टीका देखील केली आहे. २ टर्ममध्ये देशात मोदी सरकारने काही केलं नाही. काँग्रेसनं केलेलं विकायचे बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांनी मागील दोन टर्म मध्ये काहीही केलं नाही

शिवसेने नेते भास्कर जाधव यांनी महागाईवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलं असल्याचे भास्कर जाधव म्हणाले आहेत. तसेच मोदींची मिमिक्री करत भास्कर जाधव म्हणाले की, २०१४ साली या देशात ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं आहे का? मोदींना लोकांनी सांगितले काही नाही केलं मात्र आता लोकांना कळाले आहे की, काँग्रेसनं केलेलं विकायचे बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन टर्म मध्ये काहीही केलं नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

हा तुमचा विश्वासघात करत आहेत

देशात महागाई महागाई म्हणजे किती महागाई झाली आहे. घरगुती गॅसच्या किंमती किती झाल्या आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी उज्वला गॅस योजना आली तेव्हा सगळे धावत सुटले मोदी फुकट गॅस देत आहेत. परंतु मी सातत्याने सांगत होतो की, हे फुकट गॅस देणार नाहीत हा तुमचा विश्वासघात करत आहेत. तुमची सबसिडी बंद करणार आहेत. एखाद्याच्या दुकानात गेल्यावर त्याने फुकट माल दिला आणि त्याने नंतर ते वसुल केले याचा अर्थ त्याने फुकट दिलं नाही तर उधार दिलं आहे. तो सहव्याज पैसे घेणार आहे असे यापूर्वीच सुचित केलं असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

मोदी सरकारने फसवणूक केली

गॅस पाईप १.८ मीटरचा होता तो आता १.४ मीटरचा केला आहे. इथून पैसे खाण्याचे काम केले आहे. केंद्रातील मोदी सरकारने अनुदान काढून घेतले या अनुदानामुळे तुम्हाला जो एक वर्ष गॅस मोफत मिळणार होता तो आता विकत देण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. प्रचंड महागाई वाढली आहे. म्हणून मोदी सरकार सगळ्या पातलीवर पुर्णपणे अपयशी ठरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५०० रुपये भरून आजपासून जिओ स्मार्टफोनची नोंदणी

News Desk

“मवाळपणा माझ्या रक्तात नाही” – नारायण राणे

News Desk

मोठी बातमी! ‘फेसबुक’ने बदललं आपलं नाव, लोगोतही बदल; जाणून घ्या कारण

swarit