नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे चिंतेचे वातावरण आहेच. त्यात भर ही सोशल मीडियामूळे पडत आहे. कोरोनासंबंधी सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. सगळ्यात जास्त व्हॉट्सअॅपवर हे मेसेजेस फॉरवर्ड केले जातात. त्यामूळे व्हॉट्सअॅपने मेसेज फॉरवर्डींगवर आता मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
या आधी व्हॉट्सअॅपवर एक मेसेज ५ जणांना पाठवू शकत होतो पण आता व्हॉट्सअॅप युजर्स कोणताही मेसेजफक्त एकालाच पाठवू शकणार आहे. मात्र, हे फीचरचा वापर व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर करता येणार आहे. दरम्यान, पी.टी.आयने या संबंधी ट्विटही केले आहे.
दरम्यान, फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. यामुळे कोरोनाच्या खोट्या बातम्या पसरण्यावर निर्बंध लागू शकेल. जगभरात व्हॉट्सअॅपचे अब्जाहून अधिक युजर्स आहेत. त्यामूळे निश्चितच खोट्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे नवे फीचर उपयोगाचे ठरणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.