HW News Marathi
Uncategorized

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल!

मुंबई। कोरोनाच्या भीतीमुळे राज्य सरकारने निर्बंध लागू करुन लॉकडाऊन सुरुच ठेवला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे. राज्यातील जनजीवन बंद ठेवून चालणार नाही कोरोनाच्या संकटाला परिस्थितीनुसार सामोरे गेले पाहिजे. ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना निर्बंधांतून सुट दिली पाहिजे असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही असंच म्हटलं आहे.

अशा नागरिकांना निर्बंधांतून सूट द्यावी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि निर्बंधांवरुन राज्य सरकारला प्रश्न केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याप्रमाणे यापुर्वी मत व्यक्त केलं आहे. ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा नागरिकांना निर्बंधांतून सुट द्यावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे नियम लावून या नागरिकांना व्यवहारात सुट दिली पाहिजे. कोरोना संकट असलं तरी राज्याला असा बंद ठेवून चालणार नाही. या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या भीतीनं अनिश्चित काळासाठी समाजाला बंद करुन ठेवणार आहात का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दोन लसीचे डोस घेतलेल्या नागिरकांना निर्बंधांमध्ये सुट देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे. आगामी दिवसात कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांमध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भगवान आणि गाय या दोघांना सोडले तर केंद्र सरकारने सर्वांवर GST लावला,” सुप्रिया सुळेंचा टोला

Aprna

Chandrakant patil Vs Balasaheb Thorat | भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली..

Arati More

महाविकासआघाडी सरकारला कसलाचं धोका नाही,अजितदादांना विश्वास !

Arati More