HW News Marathi
Uncategorized

‘या’कारणामुळे विखेंना कॉंग्रसमध्ये घरवापसी करावी लागणार ?

अहमदनगर | माजी विरोधी पक्षनेते आणि सध्याचे शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याविषयी सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसमध्ये घरवापसी करू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. त्यामागे काही कारणेसुद्धा आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्नी शालिनी विखे या अद्यापही अहमदनगर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष्या आहेत ते हि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या. लोकसभा निवडणुकीच्या आधी सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आणि त्यांना लोकसभेचे भाजपकडून तिकीट मिळालं आणि ते विजयीसुद्धा झाले.त्यांनतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखेंनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या पत्नी काँग्रेसमधेच आहेत. एका घरात मुलगा आणि वडील भाजपात आणि आई काँग्रेस मध्ये आहे .

भाजपमध्ये गेलेल्या राधाकृष्ण विखेंनी विधानसभेला अहमदनगर जिल्ह्यातील १२ उमेदवार निवडून आणू असे ठोसपणे सांगितलं मात्र त्यांना ते वचन पाळता आलं नाही , आणि भाजपने अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. माजी पालकमंत्री राम शिंदे आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. या परभाला विखे जबाबदार असल्याची तक्रार या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आणि कोअर कमिटीच्या बैठकीत तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. मात्र आता सकारात्मक चर्चा झाली असून पुढील काळांत आपण आणि विखे सोबत काम करू असं काल राम शिंदे यांनी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितलं आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेची निवडणूक येत्या ३१ डिसेंबर ला आहे . राधाकृष्ण विखे हे पुन्हा आपल्या पत्नीला अध्यक्षपद मिळावे म्हणून आग्रही आहेत. भाजपने अद्याप यासंबंधी निर्णय घेतलेला नाही.त्याचपद्धतीने महाविकासआघाडी हि निवडून एकत्रितपणे लढत असल्याने भाजपासमोर मोठे आव्हान आहे . त्यामुळे गेल्या जिल्हापरिषदेच्या काँग्रेस- राष्ट्रवादीकडून अध्यक्ष झालेल्या शालिनी विखे आता पुन्हा अध्यक्ष होतील कि नाही यावर शंका आहे. सत्तेत राहून कामे करता येतात असं म्हणत अनेकांनी भाजपचा रस्ता पकडला. आता त्याच सत्तेसाठी परतीचा मार्ग हे नेते निवडणार का ? ज्याप्रमाणे विजयसिंह मोहिते- पाटलांना आपण राष्ट्रवादीमध्ये असल्याची आठवण झाली तशीच आठवण आता विखेंना आपल्या पत्नीच्या बाबतीत होणार का ? आणि ज्या पक्षांना हे नेते अडचणीच्या काळात सोडून गेलेत त्या पक्षांनी यांचे परतीचे दोर कापले आहेत कि त्यांना परतण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीचे दरवाजे आजही ओपन आहेत हे पाहणं आता  महत्वाचं असेल ..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

राज्यात गळीत हंगामाला सुरुवात, दीडशे कारखान्यांना परवाना

News Desk

देशात गेल्या २४ तासात ९१९ नवे रुग्ण, ३१ जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू | केंद्रीय आरोग्य मंत्रालय

News Desk