HW News Marathi
Uncategorized

वर्षाखेरीस जहीर-सागरिकाचा शुभमंगल..

मुंबईः श्रीरामपूरचा सुपूत्र आणि वेगवान गोलंदाज जहीर खान लवकरच दुसऱ्या इनिंगची सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. ही इनिंग क्रिकेटमधील नसून त्याच्या खासगी आयुष्याशी निगडीत आहे. या वर्षाअखेर अभिनेत्री सागरिका घोष हिच्यासोबत तो विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द सागरिकाने याला दुजोरा दिला आहे.सागरिका सध्या जहीर खानबरोबर सुट्या एन्जॉय करीत आहे. जहीर आणि सागरिकाने साखरपुडा करून बराच कालावधी झाला असून, त्यांनी लवकरच लग्नाच्या बंधनात अडकावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. सध्या जहीर क्रिकेटमध्ये फारसा सक्रिय नसला तरी, व्यावसायिक जीवनामुळे तो सध्या व्यस्त आहे, तर सागरिकाही लवकरच काही नव्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. अशात हे दोघे केव्हा लग्नाच्या बंधनात अडकतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ सुरू 

News Desk

अयोध्या प्रकरणातील १८ पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

News Desk

आंबेडकर नगरातील अवैद्य देशीदारूसह कुंटनखाना विरोधात महिलांचा एल्गार

News Desk