HW News Marathi
Uncategorized

हुसेन बोल्टच्या कारकीर्दीचा पराभवाने अंत

लंडन – आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत क्वचितच पराभवाचे तोंड पाहिलेल्या उसेन बोल्टच्या कारकीर्दीचा शेवट मात्र पराभवाने झाला. जगातील सर्वांत वेगवान धावपटू अशी ख्याती असलेल्या बोल्टला अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने लंडनमधील १०० मीटरची शर्यत ९.९२ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले, तर अमेरिकेच्याच क्रिश्चन कोलमनने ९.९४ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. बोल्टला मात्र या शर्यतीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. हे अंतर त्याने९.९५ सेकंदात पार केले.

वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमधील शर्यतीनंतर कारकीर्दीची सांगता करणार असल्याचे जमैकाच्या युसेन बोल्टनेआधीच जाहीर केले होते. या मानाच्या स्पर्धेत तो १२ वे सुवर्णपदक जिंकेल याची खात्री त्याच्या चाहत्यांना होती. पण सुरुवातीलाच काहीतरी बिनसल्याने त्याला शेवटपर्यंत सूरच गवसला नाही. परिणामी, बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तो शर्यत हरला, पण आपल्या खिलाडू वृत्तीनं त्याने सगळ्यांचीच मने जिंकली. जस्टीन गॅटलीन जिंकल्याचं स्क्रीनवर झळकताच, बोल्टन त्याच्याजवळ जात त्याला मिठीच मारली. तेव्हा, संपूर्ण स्टेडियममध्ये युसेन बोल्टच्या नावाचा जयजयकार सुरू होता. १०० मीटर ट्रॅकचा निरोप घेताना तो काहीसा भावुकही झाला होता. उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन करत, काही जणांसोबत सेल्फी काढत तो मैदानाबाहेर गेला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त” पडळकरांचा घणाघात!

News Desk

‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

News Desk

राहुल गांधीमुळे माझा मुलगा पायलट झाला

News Desk
मुंबई

मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस

News Desk

मुंबई- मुंबईसह उपनगरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. कुलाबा, नरिमन पॉइंटसह इतर भागात पहाटेपासून जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल झाले. राज्याच्या इतर भागात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नाशिक, जळगावसह पश्चिम महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने सातत्य ठेवल्यास खरिपाच्या पेरण्य हाती लागतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Related posts

मुंबईमधील वाडिया रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आग

Aprna

ए पी मंडईतील व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना दिलासा

News Desk

शिवसेनेच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले

News Desk