HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांची महाराष्ट्रातही निवडणुक लढवण्याची हिंमत कधी झाली? – चंद्रकांत पाटील

मुंबई | देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. तर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. दरम्यान, शिवसेना यावेळेस गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. अशातच गोवा विधानसभा निवडणुकीतील उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरुन सध्या शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर यांच्या तिकीटावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. उत्पल पर्रिकर यांना जर अपक्ष म्हणून लढायचं असेल सर्व पक्षांनी मिळून त्यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन राऊतांनी केलं होतं. तर त्यावर पाटलांनीही प्रत्युत्तर देत आम्ही उत्पल पर्रिकर यांना तिकीट दिलं तर तुम्ही निवडणूक बिनविरोध कराल का, असा सवालही केला होता. त्यानंतर पुन्हा राऊतांनी पलटवार करत उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचे की नाही, याचे अधिकार चंद्रकांत पाटलांच्या हातात नाहीत. ते केवळ बोलघेवडे आहेत, अशी टीका केली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत?

राऊतांनी ट्वीटद्वारे पाटलांना उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, “सगळीच येड्यांची जत्रा… कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीमध्ये नाव असणं गरजेचं असतं, एवढं भाजपा नेत्यांना माहिती नाही, याचं आश्चर्य वाटतं”, असं राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ‘ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो’ असा टोलाही लगावला होता.

“संजय राऊत लवकर बरे व्हा”

दरम्यान, आता पाटलांनीही राऊतांवर हल्ला चढवला आहे. पाटील म्हणाले, “संजय राऊत यांचे नाव महाराष्ट्राच्या यादीत आहे, पण महाराष्ट्रातही त्यांची निवडणुक लढवण्याची हिंमत कधी झाली? माझ्या वक्तव्यातील व्यंग कळू नये, हे तुमच्यासारख्या पत्रकारासाठी मोठं दुर्दैव आहे. पण असो, इतर राज्यांतील उमेदवारांचे डिपॉझिट जमा होईल या तणावात होत असेल कदाचित.” असं ट्वीट पाटलांनी केलं आहे. तसेच पुढे त्यांनी राऊतांना ‘लवकर बरे व्हा!’ असंही म्हंटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार’, गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका!

News Desk

“फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसलेंवर कारवाई?” – अंजली दमानिया

News Desk

#CoronaVirus | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ वर

News Desk