मुंबई | “विधान परिषदेसाठी भाजपच्या वतीने अधिकृत पाच आणि अपक्ष एक अशा सहा जागांसाठी प्रयत्न करणार असून भाजपच्या सहा जागा निवडून येतील,” असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थिती खापरेंनी आज (9 जून) उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून सदाभाऊ खोत यांना भाजपने समर्थन दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपच्या केंद्रीस संसदीय बोर्डाने माननीय जगतप्रकाशजी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकृत उमेवार घोषित केले. त्यातील चार उमेवारांचा अर्ज काल (8 जून) आम्ही भरले. पाचव्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आजभरला आहे. या व्यतिरिक्त भाजपने शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचाही अपक्ष उमेदवारीअर्ज भरलेला आहे. सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारीला भाजपचे समर्थन आहे. यामुळे पाच अधिकृत एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भाजप प्रयत्न करणार आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे, भाजपचे राज्याचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे आणि भाजपच्या राज्याचे उपाध्यक्ष प्रसाद लाड. या व्यतिरिक्त सदाभाऊ खोत यांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपने समर्थन दिले आहे.
सदाभाऊ खोत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येणार
भाजपने विधानपरिषदेसाठी सहा अर्ज भरलेले असून विजय होण्याचे गणित कसे जुळवून आणार?, प्रश्नावर पाटील म्हणाले, “सदाभाऊ खोत विषेशतहा शेतकऱ्यांमधील लोकप्रिय नेतृत्व आहे. अलीकडच्या काळामध्ये एसटी कर्माचाऱ्यांच्या संपामध्ये सुद्धा सादभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी त्या आंदोलनात प्रत्यक्ष आझाद मैदानामध्ये उपोषणात सहभागी होऊन सहभाग नोंदविला होता. त्यामुळे शेतकरी असो, किंवा या राज्यातील अन्याय होणार शेतकरी असो. यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊ ना सद्विवेक बुद्धीला स्मरणून आमदार मतदान करतील. मुद्दा राहिला पाचव्या जागेचा, त्यासाठी अवश्यक मते सद्विवेक बुद्धीला स्मरण देतील. भाजपचे पाच आणि अपक्ष पुरस्कृत सहा उमदेवार हे विधान परिषदेत निवडून येतील.”
अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर
आमदार अतुल सावे म्हणाले, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझे वडील स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. अतिशय दुखात घटना आहे. माझे वडील मोरेश्वर सावे कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. पण अयोध्याला जावून आल्यावर प्रखर हिंदुत्व मांडत होते. हे शिवसेनेतील नेत्यांना अवडले नाही. म्हणून त्यांनी त्यांचे खच्चीकरण केले. शिवसेनेने त्यांना साधे लोकसभेचे तिकीट देखील दिले नाही. अशा या काल मुख्यमंत्र्यांनी अर्धी गोष्ट सांगितली. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण गोष्टी का नाही सांगितली हा माझा त्यांना प्रश्न आहे. जर तुम्हाला ऐवढा अभिमान होता. लोकसभेचे तिकीट का दिले नाही. लोकांनी त्यांना धर्मवीर पदवी दिली होती. ती तुम्ही का ? मान्य केले नाही. उलट तुम्ही त्यांचे खच्चीकरण केले. आणि त्यांना लोकसभेचे तिकीट देखील दिले नाही. त्यामुळे माझा उलटा प्रश्न उद्धव ठाकरेंना आहे. ते कारसेवक भरून संभाजीनगरमधून एक ट्रेन गेली होती. त्यातून ते गेले होते. कारसेवक म्हणून मी तुम्हाला आजही सांगतो. संभाजीनगरमधून एक ट्रेन भरून लोकस कारसेवक म्हणून गेले होते. त्यात माझे वडिल गेले होते. त्याशिवसेना असा विषय नव्हता. त्यावेळी प्रखर हिंदुत्व मानणारे काही लोक, बंजरंग दल, शिवसेना आणि भाजप सर्व हिंदूत्व मंडळी त्या ट्रेनमध्ये संभाजीनगरवरून अयोध्येला गेले होते.”
संबंधित बातम्या
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून निंबाळकर आणि खडसेंना संधी
विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ पाच उमेदवारांची नावे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.