मुंबई | ‘हिंदुत्वाचा बाप जर या कोणी जगात असेल ते आपले बाळासाहेब ठाकरे म्हणून आजच्या फादर्स डेचे महत्व आहे,’ असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेच्या 56 वा वर्धापन दिना निमित्ताने आज (19 जून) पवई येथील हॉटेल वेस्ट इन हा सोहळा पार पडला. यात उपस्थित आमदार आणि शिवसैंनिकांना संबोधिक करताना राऊतांनी केंद्र सरकाच्या अग्निवीर, विधान परिषद निवडणूक, हिंदुत्व, राणा दाम्पत्य, भाजप, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी मुद्यांवरून तोफ डागली.
56 वर्षाचा झंझावात!!! pic.twitter.com/wGfjMHfKHm
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 19, 2022
राऊत म्हणाले, “आज शिवसेचा 56 वा वर्धापन दिन आहे. 56 वर्षापूर्वी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ठिणगी या मुंबईत टाकली. या ठिणगीच्या 56 वर्षभरात जो वनवा पेटलेला आहे. त्या वनव्याचा आज वर्धापन दिन आहे. आज महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थिती आहेत. उद्धव ठाकरे जेव्हा व्यासपीठावर आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पन केले आहे. आणि शिवसेना प्रमुखांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माहिती दिली की बाबा आज ‘फादर्स डे’ आहे. म्हणजे वडिलांना जागतिक स्तरावर यूनोनी ठरविले आहे. आज फादर्स डे आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोण आहेत आले. बाळासाहेब नेहमी म्हणायचे जेव्हा फादर ऑफ नेशन जेव्हा राष्ट्रपती उल्लेख यांचा तेव्हा ते म्हणायचे की, देशाला बाप नाही. नेहमी बोलयाचे या देशाला बाप नाही. आज फादर्स डे निमित्ताने मी आज सांगू इच्छितो शिवसेना प्रमुख फादर्स ऑफ हिंदुत्व. हिंदुत्वाचा बाप जर या कोणी जगात असेल ते आपले बाळासाहेब ठाकरे म्हणून आजच्या फादर्स डेचे महत्व आहे. आमच्यासाठी फादर्स डेचे महत्व काय आहे. हिंदुत्वाचा आमचा बाप या देशातील नव्हे तर जगातील प्रत्येक जण ज्याच्या मनात हिंदुत्व आहे. ज्याच्या रोमा रोमात हिंदुत्व आहे. तो प्रत्येक दिन माननीय बाळासाहेब ठाकरे आपला बापच मान तो आणि बाप एकच असतो. हिंदुत्वाचे बाप कसे आहोत.”
तेरा घमेंड चार दिन का है पगले, भाजपला टोला
“मी इतकेच सांगेन शिवसेनेचा 56 वाढदिवस आहे. मला सकाळी नेहमी प्रमाणे पत्रकारांनी विचारले. 56 वा वाढदिवस आहे मी म्हटले होय, हा वाढदिवस नाही हा तुफानाचा वाढदिवस आहे. आणि अब तक छप्पन अजून पुढे बरच आहे. हे आमच्या राजकीय विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. राजकारणात काही लोकांना फार घमेंड आली आहे. राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या पार पडल्या आहे. ठिक आहे एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांची घालमेल सुरू आहे. पण मी इतकेच सांगतो एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले असे नाही, महाराष्ट्र जिंकले असे नाही. या राज्याची सूत्रे ही शिवसेनेकडेच असतील. आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील फार घमेंड करू नका. अगदी स्पष्ट सांगायचे तेरा घमेंड चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी हे आणि ती राहणार ते दिसेल. या बादशाहीला नख लावण्याची हिम्मत अजून कोणामध्ये पैदा झालेली नाही. कोणी किती हवेत तलवार बाजी करू द्या,” असे राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या
शिवसेनेचा 56 वर्धापन दिन हॉटेल वेस्ट इनमध्ये होणार साजरा; उद्धव ठाकरे काय बोलणार?
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.