HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली? काय आहे पार्श्वभूमी

मुंबई : आगामी काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका घेऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षियांची अंतर्गत हालचाल होताना दिसत आहे. मुंबई महानगर पालिकेत शिवसेना गेल्या 25 वर्षापासून सत्तेत आहे. तर येत्या काळात मुंबई महानगर पालिकेचे समीकरण बदलण्यासाठी भाजप ,मनसे आणि शिंदे गट प्रयत्न करत आहे. सर्व पक्षीयांची आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसे भाजप युतीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसंपासून जोर धरत आहे. अश्यातच आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याची बातमी आली. मात्र दोन्ही पक्षाकडून भेटी संदर्भातल्या चर्चां फेटाळण्यात आल्या.

राज ठाकरे भाजप सोबत असल्याचं दिसून येत असे आरोप केले काही काळ होत आहेत. राज ठाकरे यांनी भोंग्याविरुढ घेतलेल्या भूमिकेला भाजपाने पाठिंबा दर्शवला. मशिदी बाहेरील भोंग्याच्या मुद्यावरून देखिल उद्धव ठाकरेंना थेट टारगेट करण्यात आल. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडल्याचे देखिल त्यांच्यावर आरोप राज ठाकरें कडून करण्यात आले.

राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जाहीर सभा घेतल्या सभेदरम्यान, भाषण करताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर थेट निशाणा साधला. तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारच भरभरून कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज यांनीकौतुक केलं. भाषणा दरम्यान राज ठाकरे यांच्याकडून तत्कालीन सरकारला अल्टिमेटम दिले गेले. भाषणात केंद्र सरकारच भरभरून केलेलं कौतुक आणि महा विकास आघाडी सरकारवर साधलेला निशाणा. यावरून राज ठाकरेंना अनेक टीकेला सामोरे जावे लागले. ED ची नोटिस आल्यानंतर राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बदलली गेली राज ठाकरे सध्या भाजपच्या प्रवक्त्या सारखं काम करत आहे अश्या पद्धतीच्या टीकेला त्यांना सामोरे जावं लागलं.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला मनसेने जाहीर पाठिंबा दर्शवला होता. बहुमत चाचणीत देखिल मनसे भाजपच सोबत असल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप मनसे सोबत येणार असल्याचं बोललं जातंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर भुजबळांना जामीन मंजूर

News Desk

योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार…!, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

अर्णब गोस्वामींसाठी राज्यपालांची गृहमंत्र्यांना सूचना, कुटुंबीयांना भेटू देण्याचे दिले निर्देश

News Desk