HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेत ‘मविआ’च्या पदरी निराशा; मलिक, देशमुख मतदानापासून वंचित

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेत नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेत मतदान करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नकारली आहे. यामुळे मलिक आणि देशमुखांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पदरी निराशाच आली.  जेल किंवा पोलीस कोठडीत असताना मतदानाचा हक्क बजावता येत नाही, या याचिकेवर आज (20 जून) सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती म्हणाले.

मलिक आणि देशमुख यांनी राज्यसभा आणि विधान परिषदे निवडणुकीत मतदान करता यावे, म्हणून विधान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे मलिक आणि देशमुखांना मतदानाचा हक्क बजावला आला नव्हता. राज्यसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. विधान परिषदे तरी मतदान करता यावे म्हणून मलिक आणि देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मतदान करण्याची याचिका फेटाळून लावली

संबंधित बातम्या
राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का; मलिक-देशमुखांचा मतदानाचा अर्ज फेटाळला

Related posts

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करा – रविंद्र चव्हाण

Manasi Devkar

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

News Desk