HW News Marathi
Covid-19

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना कोरोनाची लागण

पुणे | राज्यात पन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राजकीय मंत्री व आमदारांना कोरोनाची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (५ जानेवारी) सकाळीच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली. तर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

रुपाली चाकणकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

याआधी सकाळी प्रवीण दरेकरांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय प्रताप सरनाईक, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, वर्षा गायकवाड यांच्यासह हर्षवर्धन जाधव, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, अरविंद सावंत, वरुण देसाई यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले आहे. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी दररोज कामानिमित्त अनेकांच्या संपर्कात येत असतात. त्यांचे अनेक ठिकाणी दौरे असतात. कार्यक्रम असतात. त्यामुळे त्यांना अनेक लोकांना भेटावंच लागतं. त्यामुळे राजकीय कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1478675432505438208?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

Corona World Update : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाखांच्या वर

News Desk

अमोल कोल्हेंचा कोरोनावरील ‘फॅबीफ्लू’ औषधाला आक्षेप, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

News Desk