मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघरमध्ये वैतरणा नदीची अचनाक पाणी पातळी वाढल्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी मुंबई-बडोदा महामार्गवर उड्डाणपुलाचे कामासाठी कामगार गेले होते. वैतरणा नदीला आलेल्या पुरामुळे 10 कामगार येथे अडकून पडले होते. हे कामगार गेल्या 18 तासांपासून येथेच अडकलेले होते. या कामगारांना आज (14 जुलै) एनडीआरएफने 10 कामगारांना सुखरुप बाहेर करण्यात आली.
दरम्यान, एनडीआरफमध्ये अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु, पावसाचा वाढता जोर पाहात एनडीआरफने बचाव मोहिम थांबविली होती. पण, पुन्हा एनडीआरफने आज सकाळी मोहिम सुरू केली. यानंतर एनडीआरफच्या जवानांना 10 कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. पालघर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीने धोक्याची पातळी वाढली आहे. मुंबई बडोदा द्रुगती महामार्गासाठी दहिसर आणि बहाडोली गावामध्ये वैतरणा नदी पात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी जी आर इन्फ्रा कंपनीकडून बार्ज तैनात करण्यात आले होते. पुलासाठी नदी पात्रात मध्यमागी पिलर उभा करण्यासाठी बार्जवर कामगार गेले होते.
Maharashtra | Ten workers of GR infrastructure were trapped in Vaitarna River in Palghar on July 13. NDRF team, upon receiving requisition from Palghar Tehsildar, moved for rescue ops & kept constant vigil throughout night; all 10 workers successfully rescued from the site: NDRF pic.twitter.com/CtrrRuNTeS
— ANI (@ANI) July 14, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.