HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रपतींना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात निवेदनावर सही करणं भाजप खासदारानं टाळलं!

नवी दिल्ली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. मराठा संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारला इशारा देत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही आहे. पण भाजपच्या प्रतिनिधींनी या निवदेनावर सही करणं टाळलं असल्याचं पाहयला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात एकी नसल्याचं दिसून आलं.

हे प्रतिनिधी हजर होते

संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रतिनिधी पाठवले. त्यात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचा समावेश होता. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली.

50 टक्क्यांची मर्यादा वाढवण्यावर एकमत नाही

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी घटनादुरुस्ती करत राज्यांना अधिकार दिले असले तरी 50 टक्क्यांची मर्यादा काढावी अशी मागणी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून करण्यात आली. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिलीय. तर आम्ही आरक्षणासाठी एकत्र आहोत. पण 50 टक्क्यांची मर्यादा वाढवण्यावर एकमत नसल्याचं भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितलं. तसंच गरज पडल्यास शक्य ती सर्व मदत करणार, असंही रणजितसिंह यावेळी म्हणाले.

आरक्षणाचे जनक असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली

राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही सविस्तरपणे आमची बाजू मांडली. राष्ट्रपतींनी सर्व पार्श्वभूमी ऐकून घेतली आहे. तसंच राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली. तसंच मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आहे. आता मला या विषयी अभ्यासासाठी थोडा वेळ द्या, असं राष्ट्रपतींनी सांगितल्याचं संभाजीराजे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीने पुन्हा सत्ता मिळवायची कशी?; अर्जुन खोतकरांनी सांगितला फॉर्म्युला

News Desk

दिवसरात्र आपले रक्षण करणाऱ्या पोलिस कॉन्सटेबलचीही आर्थिक मदत

News Desk

गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी, मनसेची मागणी

News Desk