HW News Marathi
राजकारण

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रविण दरेकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड

मुंबई | मुंबै बँकेच्या (Mumbai Bank) अध्यक्षपदी भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दरेकरांचे मुंबै बँकच्या अध्यक्षपदावरून त्यांना पाय उतार व्हावे लागले होते. राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यानंतर दरेकर पुन्हा एकदा मुंबै बँकेत अध्यक्ष पदावर निवड झाली.

दरेकर मुंबै बँकेचे अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गेल्या आठवड्यात बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर विठ्ठल भोसलेंनी देखील त्यांच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

महाविकास आघाडीच्या काळात बँकेच्या झालेल्या निवडणुकीत सिद्धार्थ कांबळे हे बँकेचे अध्यक्ष म्हणून विजयी झाले होते. तर भाजपचे नेते प्रसाद लाड यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळेंचा 11 मते मिळून विजय झाला. तर प्रसाद लाढचा 9 मतांनी पराभव झाला होता. दरेकरांनी मुंबै बँक मंजूर प्रवर्गातून त्यांनी खोटे कागदपत्रे दिल्याचा ठपका ठेवला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या नेत्यांना पंढरपुरची महापूजा करता आली नाही

swarit

सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोक त्याविरोधात आवाज उठवतात! – शरद पवार

Aprna

निवडणुकीपर्यंत अमित शहा यांच्याकडे भाजपचे नेतृत्त्व

News Desk