HW News Marathi
महाराष्ट्र

‘अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन!’

मुंबई | हिंदी सिनेसृष्टीतील आणि बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सिद्धार्थ शुक्लाची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

मनोरंजन विश्वात पदार्पण

सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.

तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. नंतर त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर त्यांना ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर त्याला कलर्स टेलिव्हिजनचा शो ‘बालिका वधू’ मध्ये ‘शिव’ची भूमिका मिळाली. सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी

Aprna

भाजपचं ‘मिशन बारामती’ यशस्वी होणार? का भडकल्या निर्मला सीतारामन

Manasi Devkar

स्मार्ट प्रकल्पांतर्गत लातूर जिल्ह्यात कृषि आधारित १४ उपप्रकल्प उभारणीसाठी २१ कोटींचे अनुदान

Aprna