HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र

‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत IT विभागाने काढली वरात; जालन्यात कोट्यवधींचं घबाड जप्त

जालना | एखाद्या सिनेमात घडते त्याप्रमाणे आयकर विभागाने (Income Tax Department) एंट्री घेत जालन्यात (Jalna) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असे स्टिकर असलेल्या लग्नाच्या गाड्यांमधून येत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना येथील स्टिल उत्पादन करणाऱ्या कारखानदारांच्या घर, फार्म हाऊस आणि कार्यालयांवर छाप टाकला. या छाप्यात तब्बल 58 कोटी रुपयांची रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

जालन्यातील स्टील व्यावसायिकांवर छापे टाकाण्यास १ ऑगस्टपासूनच सुरुवात झाली होती. आयकर विभागाने केलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे यासह 16 कोटींचा ऐवज सापडला आहे. इतकंच नाही तर 300 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्र सुद्धा सापडली आहेत. ही रक्कम इतकी मोठी होती की ती मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 14 तासांचा कालावधी लागला. यावरून ही कारवाई किती मोठी आहे याचा अंदाज येतो. अधिकाऱ्यांना कपाटांच्या खाली, खाटांमध्ये आणि कपाटांमध्ये काही बॅगांमध्ये रोख रक्कम सापडली. सर्वत्र नोटांचे बंडले सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना कपाटांमध्ये, कपाटांच्या खाली, बेडमध्ये आणि काही बॅगांमध्ये नोटांचे बंडल सापडले.

दरम्यान, 1 ऑगस्टपासूनच आयकर विभागाची कारवाई सुरू झाली होती. प्राप्तिकर विभागाच्या औरंगाबाद पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील 4 बड्या स्टील कारखानदारांची झडती घेण्यात आली. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबाद पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील 4 बड्या पोलाद कारखानदारांनी व्यवसायातून कोट्यवधी रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्नाची संपूर्ण नोंद न करता रोखीचे व्यवहार केले आहेत. या छाप्यादरम्यान बराच काळा पैसा अधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील; निती आयोगाने सहकार्य करावे! – मुख्यमंत्री

Aprna

“नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी, दोषींवर कारवाई होणार” – अशोक चव्हाण  

News Desk

अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या नगरसेवकाला तुरुंगवास

News Desk