मुंबई | काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या आई पाऊलो मायनो यांचे 27 ऑगस्ट रोजी निधन झाले आहे. सोनिया गांधी यांच्या आईचं तीन दिवसापुर्वी निधन झाले आहे. सोनिया गांधींची आई पाऊलो मायनो या दीर्घ काळापासून आजारी होत्या. काँग्रेसचे मीडिया प्रमुख जयराम रमेश यांनी आज (31 ऑगस्ट) ट्वीट करत सोनिया गांधींच्या आईचे निधन झाल्याची माहिती दिली.
या ट्वीटमध्ये जयराम रमेश म्हणाले, “सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट 2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांचा दफनविधी काल झाला आहे.”
Smt. Sonia Gandhi’s mother, Mrs. Paola Maino passed away at her home in Italy on Saturday the 27th August, 2022. The funeral took place yesterday.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 31, 2022
सोनिया गांधींच्या आईचे निधन झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. मोदी ट्वीटमध्ये म्हणाले, “सोनिया गांधी जी त्यांच्या आई पाऊलो मायनो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात. तिच्या आत्म्याला शांती लाभो. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार संपूर्ण कुटुंबासोबत आहेत.”
Condolences to Sonia Gandhi Ji on the passing away of her mother, Mrs. Paola Maino. May her soul rest in peace. In this hour of grief, my thoughts are with the entire family.
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2022
दरम्यान, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे 24 ऑगस्ट रोजी परदेशी दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यादरम्यान सोनिया गांधी त्यांच्या आईची भेट घेतल्याचे सांगितले जाते
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.