HW News Marathi
राजकारण

‘शिवाजी पार्क’वरील शिंदे गटाच्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने काय म्हटले…

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिली आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने याचिका दाखल केली होती. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयात आज (23 सप्टेंबर) पार पडलेल्या सुनावणीदरम्या शिंदे गटाची (Shinde Group) याचिका फेटाळून लावली आहे. ठाकरे गटाला येत्या 5 ऑक्टोबरला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला न्यायालयाला परवानगी मिळाली आहे. यामुळे ठाकरे गटाने शिंदे गटा विरोधातील पहिली लढाई जिंकल्यामुळे राज्यभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

 

शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे, यामुळे याचिकाकर्त्यांना परवानगी मागण्याचा अधिकार नाही. सालाबादप्रमाणे शिवसेनेकडून सदा सरवणकर हे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क परवानगी मागतात. न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज गेला होता. आणि शिवसेनेकडून अनिल देसाईने देखील पालिकेकडे शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्याची परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु,  पालिकेडून दोन्ही गटाने दाखल केलेल्या अर्जावर उत्तर न आल्यानंतर शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली. तसेच शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. परंतु, देसाईंकडे शिवसेनेचे कोणतेही पद नाही. यामुळे शिवसेनेसाठी परवानगी मागण्याचा अधिकार नाही.

 

पालिकेने दसरा मेळावाला परवानगी नकारताना काय म्हणाले

पालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. पालिकेने पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे दोन्ही गटांना मेळाव्याची परवानगी नाकारली असल्याचे पत्रातून सांगितले आहे. पालिकेने परवानगी नाकारताना म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात (शिवाजी पार्क) दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी दोन्ही बाजूने अर्ज केले होते. परंतु, मेळाव्यासाठी एका अर्जदाराला परवानगी दिली तर शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असे स्पष्टीकरण पालिकेने परवानगी नाकारण्यावरून दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची नियुक्ती होण्याची शक्यता ?

News Desk

काँग्रेसने आपल्या देशाला गेली ५० वर्षे एप्रिल फूल बनवले !

News Desk

शिवसेना कार्यकर्त्यांची पवारांना धमकी

Gauri Tilekar