HW News Marathi
राजकारण

शिवसेनेने ‘शिवाजी पार्क’ची लढाई जिंकली; ‘दसरा मेळावा’ला उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिली आहे. येत्या 5 ऑक्टोबरला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला न्यायालयाला परवानगी मिळाली आहे. न्यायालयाच्या निर्णयमुळे शिंदे गटाला मोठा दणका मानला जातो. न्यायालयाने 2 ते 6 ऑक्टोंबरपर्यंत वापरण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने आज (23 सप्टेंबर) दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेने शिवाजी पार्कची लढाई जिंकली आहे.

आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तिन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. यानंतर न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने आपला निर्णय दिला. न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांची याचिका फेटाळून लावली. पालिकेच्या निर्णयावर म्हटले की, पालिकेने त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा म्हणत न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला फटकारले.
 दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली. आणि मुंबई महापालिकेने दिलेला निर्णय हा वास्तविकतेला धरून नसल्याचे निरिक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदविले. तसेच दादर पोलिसांचे संख्याबळ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ही न्यायालयाने नमूद केले आहे.
राज्यात राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे सामना

गेल्या काही दिवसांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलेला दिसून आला. शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वी महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्ड ऑफिसमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज घेतला होता. परंतु, पालिकेच्या जी-उत्तर वॉर्डने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. यानंतर शिवसेनेने न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेकडून केली होती. न्यायालयाने काल ( 22 सप्टेंबर) सुनावणी पार पडली.

पालिकेने दसरा मेळावाला परवानगी नकारताना म्हणाले

पालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. पालिकेने पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे दोन्ही गटांना मेळाव्याची परवानगी नाकारली असल्याचे पत्रातून सांगितले आहे. पालिकेने परवानगी नाकारताना म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात (शिवाजी पार्क) दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी दोन्ही बाजूने अर्ज केले होते. परंतु, मेळाव्यासाठी एका अर्जदाराला परवानगी दिली तर शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असे स्पष्टीकरण पालिकेने परवानगी नाकारण्यावरून दिले आहे.

संबंधित बातम्या

‘शिवाजी पार्क’बाबत मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या दुपारी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

News Desk

“सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे,” उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Aprna

आज ईडीकडून होणार राज ठाकरे यांची चौकशी

News Desk