मुंबई | “आपल्या परंपरेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या”, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने केले आहे. शिवसेनेने शिवाजी पार्कवर दसरा मेळवा (Dasara Melava) घेण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज (23 सप्टेंबर) सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबादारी न्यायालयाने राज्य सरकारवर टाकलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार सुद्धा याला जबाबदार राहणार आहे. आणि राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडणार आहे, अशी मला आशा आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो. गेल्या ६६ सालापासून त्यासंबंधीच्या केसमध्ये आम्हाला विजय मिळाला आहे. मी म्हणतो न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरलेला आहे. आता न्यायदेवतेनं आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रेमींना आणि माता-भगिनींना आवाहन करतो की, या उत्सहामध्ये या, वाजत-गाजत गुलाल उधळत या. पण, शिस्तीने या, कुठेही आपल्या तेजस्वी परंपरेला आणि वारसाला गालबोट लागेल, असे कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. कारण इतर काय करतील, त्यांची मला काही कल्पना नाहीये. पण आपली परंपरा आहे. आमची शिवसेना आहे तशीच आहे. उलट आमची शिवसेना अजून वाढलेली आहे. परवाचा मेळावा हा आमचा मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा होता. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबादारी न्यायालयाने राज्य सरकारवर टाकलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार सुद्धा याला जबाबदार राहणार आहे. आणि राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडणार आहे, अशी मला आशा आहे.”
शिवसेनेतील अतभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक पातळीवर संघर्षाचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.
संबंधित बातम्या
शिवसेनेने ‘शिवाजी पार्क’ची लढाई जिंकली; ‘दसरा मेळावा’ला उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
‘शिवाजी पार्क’बाबत मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या दुपारी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी
‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी
दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.