HW News Marathi
राजकारण

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी दोन शब्दांत दिली प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह काल गोठवले. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या दोघांही मोठा धक्का मानला जातो. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या पोस्टला मोठा प्रतिसाद दिला आहे.

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले,  ‘जिंकून दाखवणारच’, असे फक्त दोन शब्द त्यांनी आयोगाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली. आयोगाचा निर्णय आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आयोगाच्या निकालानंतर शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली. यानंतर सर्वांना उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती. आणि उद्धव ठाकरेंनी इस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uddhav Thackeray (@uddhavthackeray)

आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!”, असे ट्वीट करत शिंदे गटावर निशाणा साधला. या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा फोटो ट्वीट केला असून या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरे मंचावर उभे आहेत. आणि त्यांच्या मागे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे.

 

 

 

Related posts

बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

News Desk

मोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी !

News Desk

अल्पसंख्यांकांच्या एकजुटीचा नेता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होऊ शकतो !

Gauri Tilekar