HW News Marathi
महाराष्ट्र

मानवी मनोरे न रचण्याचा सरकारचा आदेश!

मुंबई। राज्यात सरकारने काही प्रमाणात शिथिल केले आहेत, मात्र सणांवर निर्बंध कायम ठेवले आहेत. आज(३१ ऑगस्ट) राज्यात दहीहंडीचा सण साजरी होणार होता, मात्र सरकारने साजरी करू नये असं बजावलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दहीहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये. मानवी मनोरे उभारून दहीहंडी साजरी करू नये. त्याऐवजी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असे गृहविभागाने म्हटले आहे.

मनसे नेते आक्रमक

करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले. दुसरीकडे, पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.

ठाण्यात दहिहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. दहीहंडी साजरी करण्यावरून ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशपांडे यांनी ही भूमिका घेतली.

नियम धुडकावून दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या मंडळांना आणि राजकीय नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांनंतरही दहीहंडी साजरी के ल्यास संबंधितांना ताब्यात घेण्याची आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. राम कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे- बंगळूर महामार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला

News Desk

गीता वाटण्याऐवजी निकाल वेळेवर लावा | उद्धव ठाकरे

News Desk

मुंगेर’सारखे हिंदुत्वावारील, दुर्गापूजेवरील हल्ले तर दडपले जात आहे, सामनातून भाजपवर हल्लाबोल!

News Desk