HW News Marathi
HW एक्सक्लुसिव क्राइम मुंबई

सिमेंट गोदामावरील दरोडा फसला आणि पकडला गेला; कसं पकडलं पोलिसांनी?

मुंबई | बऱ्याचदा चित्रपटांमध्ये गुन्हा घाडल्यानंतर पोलीस येतात असे दाखवले जाते मात्र मुंबईचे वनराई पोलीस याला अपवाद ठरले. गोरेगाव येथील सिमेंट गोदामावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दोन आरोपींपैकी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली. आमीर शेख असे त्या २० वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चॉपर, सुरा आदी दरोडय़ाचे साहित्य हस्तगत केले आहे. आमीर शेखचा साथीदार सुलतान हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गोरेगाव परिसरातील घासबाजार येथे गास्तीवर असलेल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला 2 संशयादस्पद इसम सिमेंट गोदामावर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोरेगाव पूर्वच्या सिमेंट गोदाम परिसरात सापळा रचला. तेव्हा, सिमेंट गोदाम परिसरात एका रिक्षात आमीर आणि त्याचा साथीदार बसला होता. पोलिसांना पाहताच ते दोघे पळू लागले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून आमीरला ताब्यात घेतले. मात्र, सुलतानने अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. पोलिसांनी आमिर कडून एक चॉपर, सुरा आदी दरोड्याचे साहित्य हस्तगत केले आहे.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रथमेश विचारे या संदर्भात माहिती देत असताना म्हणाले, “दोघेही सराईत गुन्हेगार असून दोघांवरही बोरिवली पोलीस ठाण्यात कलम 392 अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल आहे.” सध्या अमीर शेख याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्याचा फरार साथीदार सुलतान याचा पोलीस शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात इमारतीला स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही

News Desk

‘पोलिस सत्तेचे दलाल’ मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर पडलेले नाहीत! संदिप देशपांडे आक्रमक

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय करणार एक दिवसीय उपोषण

News Desk