HW News Marathi
राजकारण

अखेर संजय राऊत तुरुंगातून बाहेर, पहिलीच प्रतिक्रिया देत म्हणाले…

मुंबई | अखेर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज तुरुंगातून बाहेर आलेले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने  राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल 100 दिवसांनी राऊत ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले आहेत. राऊत हे आज (9 नोव्हेंबर) सकाळी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारात तुरुंगातून बाहेर आले. राऊत तुरंगातून बाहेर येण्यापूर्वीच ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून त्यांचे स्वागत केले.

 

दरम्यान, राऊतांच्या भांडूपच्या बंगल्याबाहेर रांगोळ्या काढल्या असून ढोल-ताशांच्या गजरात राऊतांचे स्वागत करण्यात आले आहेत. राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “बाहेर आलो, आता बघू. अशी पहिली प्रतिक्रिया दिली. राऊतांना पत्रकारांनी विचारले की, न्यायालयाने सांगितले की तुम्हाला झालेली अटक ही बेकायदेशी आहे, यावर राऊत म्हणाले, “आम्ही लढणारे आहोत. कार्यकर्त्यांनी पुढील कार्यक्रम ठरवला आहे.”

 

पीएमएलए न्यायालयाने फटाकरले

तसेच राऊतांच्या जामीनावर सुनावणी देताना पीएमएलए न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत केलेली अटक ही बेकायदेशीर आहे, असे म्हणत पीएमएलए न्यायालयाने ईडीला चपराक लगावली आहे. पीएमएलए न्यायालयाने म्हणाले, “122 पानाचे ऑर्डर दिलेले आहे. यातील 120 पानावर लिहिलेले आहे की, 153 पाईटवर नमुद केलेल आहे. न्यायालयाला असे वाटते की, ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत बेकायदेशीर अटक केलेली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश आणि सारंग वाधवान त्यांच्यासोबत सरकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी त्यांचीही जबाबदारी होती. 2006 ते 2018 सालापर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. तर या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई का?, झालेली नाही. ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत या दोघांना केलेली अटक ही बेकायदेशीर आहे, असा सवाल न्यायालयाने उपस्थित करत ईडीच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

संबंधित बातम्या

तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही संजय राऊतांना उद्या न्यायालयात हजर रहावे लागणार, कारण…

संजय राऊतांच्या सुनावणीदरम्यान PMLA न्यायालयाने ‘या’ कारणामुळे ED ला फटकारले

संजय राऊतांचा जामीन स्थगित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

 

Related posts

एसटी बसेस, बस स्टॉपसह सार्वजनिक ठिकाणच्या सरकारी जाहिराती तात्काळ काढा !

News Desk

#LokSabhaElections2019 : पहिल्यांदाच सोशल मीडियावर आचारसंहिता लागू

News Desk

राज्यातील नेत्यांनी विजयाबद्दल केले आहेत ‘हे’ दावे

News Desk