HW News Marathi
महाराष्ट्र

“थोतांडाच्या माध्यमातून भाजपा करतंय हिंदू धर्माचं विकृतीकरण”, सचिन सावंत यांचा घणाघात!

मुंबई। कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे गेल्या साधारण दीड ते दोन वर्षे बंद असलेली मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन आता भाजपा आक्रमक झाली आहे. राज्याच्या विविध भागात भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर आंदोलनं केली. तसंच आठवड्याभरात मंदिरं खुली करण्याची मागणीही केली आहे. यावरुनच आता कांँग्रेसने भाजपाला सुनावलं आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

सचिन सावंत यांचं ट्विट

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत सावंत म्हणतात, “शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ करोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. आध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण करणं हा हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही”.

सचिन सावंत पुढे म्हणतात, “भाजपा सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का? दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे.रुग्ण वाढले तर मोदी टिका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. पोलीसांनी कठोर कारवाई करावी बघ्याची भूमिका घेऊ नये”.

कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive Tatya Lahane | कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या बाबी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घ्या…

swarit

एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला !

News Desk

“मी कुणालाही शुर्पणखा म्हटलेलं नाही”, चित्रा वाघ याचं स्पष्टीकरण!

News Desk