मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्यासंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन आणि राहुल गांधींविरोधात निर्देशन सुरू आहे. राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज (17 नोव्हेंबर) दहावा स्मृतिदिनी आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेबांच्या स्मृती स्थळात जाऊन अभिवानद केले. “राहुल गांधींच्या सावरकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी प्रचंड आदर आहे,” अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून मांडली.
राहुल गांधींनी सावकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. याबद्दल शिंदे-फडणवीस उद्धव ठाकरे म्हणाले, “राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मी हे अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगू इच्छितो की सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतीव प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहे. कोणी किती आणि काही म्हटले तरी त्यांना पुसता येणार नाही. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याशी सूतराम संबंध नाही. सावरकरांच्या प्रेम व्यक्त करणे हे हास्यास्पद आहे. तसेच सावरकरांबद्दल बोलण्याचा कोणाला काही हक्क नाही. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. स्वातंत्र्यलढ्यापासून ते चार हात लांब होते. त्यांना स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्चा हक्क नाही. त्यांनी त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करून नये. ज्या सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला. आणि स्वातंत्र्य धोक्या आल्यावर ते अबाधित राखण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो.”
भाजप सगळेच आपल्या बुडाखाली घ्याचे आहे
विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या काळ स्मरकाचे काम पूर्ण होते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “आतापर्यंत त्यांनी बरेच काही म्हटले, ते काय तसे पूर्ण झालेले नाही.” स्मारकाचा ताबा राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी होत आहे, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “एक बघा भाजपला सगळ्यांचा ताबा पाहिजे. तो त्यांचा की नाही, हे देशातील जनतेनी ठरवायचे आहे. जिथे त्यांना पूर्ण देशाचा ताबा पाहिजे. तिथे स्मारकाचे काय?, त्यामुळे त्यांना (भाजप) सगळेच आपल्या बुडाखाली घ्याचे, हाच भाजपचा मनसुबा आहे. शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे.”
राहुल गांधी पत्रकार परिषदेत काय म्हणाले
राहुल गांधींनी सावरकरांसंर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे राजकारण चांगले तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज अकोल्यात भारत जोडो यात्रेदरम्यान पत्रकार परिषद राहुल गांधींनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र त्यांच्याकडे असल्याचा दावा केला. यावेळी राहुल गांधी हे पत्र वाचून दाखविले आहे. सावरकरांनी इंग्रजीत असलेले पत्रात लिहिले, सर, मै आपका नौकर रहना चाहूता हूँ, असे लिहिल्याचे त्यांनी सांगितले. वाचून दाखविले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, ”
संबंधित बातम्या
“भाजपला सगळेच आपल्या बुडाखाली घ्यायचे, हाच त्यांचा मनसुबा”, उद्धव ठाकरेंची टीका
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.