मुंबई | “हे सरकार षंडासारखे, नामर्दासारखे बसलेले आहे”, असे ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Rau) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike )या संघटनेने मंगळवारी (6 डिसेंबर) तोडफोड केली होती. या संघटनेने बेळगावच्या (Belgaum) हिरेबागेवाडी टोल नाक्यावर गाड्यांची तोडफोड करत आंदोलन केले होते. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर राऊतांनी आज (7 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर राऊत म्हणाले, “मी आताच वाचले आज आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणे, गृहमंत्र्यांना भेटाला दिल्लीत चाललेत. काय उपयोग आहे. त्यांना कळत नाहीत. महाराष्ट्रसंदर्भात काय?, किंबहुना महाराष्ट्राचे लजके सहज तोडता यावे. म्हणून राज्यातून शिवसेनेचे सरकार घालविले आहे. अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रात कधी आली नव्हती. इतका हतबल मुख्यमंत्री, इतके हतबल सरकरा, लाचार सरकार, या महाराष्ट्राने इतक्या 55 वर्षात पाहिलेले नाही. दोन मंत्र्यांनी काल शेपुट घातले. जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी काय झालेय या राज्यामध्ये. डरपोक सरकार यांना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही. ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही. राज्याच्या सीमा कुरतडल्या जात आहेत. त्या 105 हुतात्मानी रक्ताचे पाणी करून बलिदान देऊन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळविलेली आहे. आणि सरळ सरळ कोणी या बाजुला कुरतडतय तर कोणी त्या बाजूला कुरतडतेय, आणि हे सरकार षंडासारखे, नामर्दासारखे बसलेले आहे. होय, नामर्द सरकार आहे. अशा वेळा विरोधी पक्षाची जबाबदारी सर्वात जास्त आहे. जेव्हा जेव्हा असे संकट महाराष्टात आलेले आहे. तेव्हा तेव्हा विरोधी पक्षाने लढाई केलेली आहे.”
सरकारला एकही दिवस सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
राऊत म्हणाले, “महाराष्ट्र सरकार कोणाच्याही नावे चालू द्या. मग, शिंदे असू देत की फडणवीस असतील. महाराष्ट्राच्या अस्मितेचे महाराष्ट्राच्या सार्वजनिक मालमत्तेचे महाराष्ट्राच्या जमीनेचे रक्षण करण्यास अपयश ठरली आहे. या सरकारला एकही दिवस सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. हे त्यांनी मान्य केले पाहिजे. ज्यापद्धतीने 24 तासापासून सीमा भागामध्ये सरकारी प्रेरणेने तिथे भाजपचे सरकार आहे. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होते. हल्ले होत आहेत. आणि प्रतिकार करणाऱ्या आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करून तुरुंगात डांमबले जात आहेत. महाराष्ट्र सरकार आहे की नाही?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.