HW News Marathi
महाराष्ट्र

‘अनिल देशमुख यांना क्लीन चिट….’ पण CBI च्या माहिती नुसार…..

मुंबई। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI कडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती सकाळ पासून येत आहे.१०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता मोठी माहिती समोर आली आहे.

क्लीन चिट नाही

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. क्लीन चीट दिल्याच्या अहवालावर सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. पुराव्यांनुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडून आलेल्या एका पत्रात असे उघड झाले आहे की, काँग्रेसच्या दाव्याप्रमाणे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्राथमिक तपासात क्लीन चिट देण्यात आली नव्हती.

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, पत्रात म्हटले आहे, “प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की या प्रकरणात एक अदखलपात्र गुन्हा करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि अज्ञात इतरांनी अप्रामाणिक कृत्य करून फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.”

मुंबईतील बहुतेक खळबळजनक आणि महत्त्वाची प्रकरणे सचिन वाझे यांना सोपवण्यात आली होती आणि गृहमंत्र्यांना याची जाणीव होती, असेही तपासात म्हटले आहे. यासोबतच अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८च्या कलम ७ अंतर्गत नियमित गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याची चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

सीबीआयची कारवाई पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांची याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश योग्यच आहे आणि त्यात आम्ही कुठलाही हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही, असं सर्वोच्च न्यायलायाने सांगितलं आहे. त्यामुळे आता सीबीआयची कारवाई पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांना चौकशीसाठी पुन्हा देखील बोलावलं जाऊ शकतं. एवढच नाही तर आता त्यांच्या अटकेची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीनं ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावलं होतं. आज त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, आज देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ED समोर हजर झालेले नाहीत.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी चारवेळा समन्स बजावलं. मात्र, एकदाही अनिल देशमुख चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, एएनआयला ईडीने अनिल देशमुख संपर्कात नसल्याचं सांगितलं. “आमचा अनिल देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांचं नेमकं ठिकाण माहीत नाही. आम्ही आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आम्हाला आशा आहे की आजच्या आदेशानंतर ते तपासाला सहकार्य करतील,” असं एएनआयने त्यांच्या सुत्राच्या हवाल्याने सांगितलं आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांच्या निर्मितीमुळे ग्रामीण भागात विकासाला चालना! –  यशोमती ठाकूर

Aprna

अजित पवारांनी घेतली रस्ते कंत्राटदारांची शाळा, सहनशीलतेचा अंत पाहू नका…

News Desk

“त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर…”, जयंत पाटील यांनी व्यक्त केली खंत

News Desk