HW News Marathi
महाराष्ट्र

‘धोकादायक इमारतीमधील लोकांचे स्थलांतर करा’, – मुख्यमंत्र्यांचे बैठकीत आदेश!

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपत्कालीन विभागातील अधिकाऱ्यांसोबत घेतलेली महत्त्वाची बैठक संपली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढवा घेतला. यावेळी मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा. तसेच अतिधोकादायक इमारती, डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा असे आदेश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली बैठक

या बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त, पालिका अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, हवामान विभागाचे अधिकारी तसेच रेल्वे अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका क्षेत्रात शनिवराच्या (१८ जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. विक्रोळीतदेखील अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. ही भीषण परिस्थिती पाहता ठाकरे यांनी महत्त्वची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबईची सध्याची परिस्थिती तसेच आगामी संभाव्य आपत्ती याबाबत ठाकरे यांनी सविस्तर आढवा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा असे सांगितले. तसेच अतिधोकादायक इमारती तसेच डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्याचे नियोजन करा असेही आदेश ठाकरे यांनी दिले.

पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

या बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच आगामी काही दिवसांमध्ये पावसाची स्थिती कशी असेल याबाबत सविस्तर सांगितले. या बैठकीत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मुंबई परिसरात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस असेल.मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. या पावसाचा लोकल ट्रेनवरसुद्धा विपरित परिणाम झाला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. विक्रोळीतदेखील अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. या दोन्ही दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंटरनॅशनल डॉनही मला ओळखतात घाबरायचं नाही ! । गणेश नाईक

News Desk

परळीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा एल्गार!

News Desk

महाविकासआघाडी किंवा राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या जागेसाठी माझा विचार करावा | सुरेखा पुणेकर

News Desk