HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री आणि आंबेडकर यांची मंत्रालयात बैठक; राजकीय विषयावर चर्चा होण्याची शक्यता

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची मंत्रालयात बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री आणि आंबेडकर या दोघांमध्ये इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती माध्यमातून येत आहे. आणि या बैठकीदरम्यान राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे दोन्ही नेत्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित असणार आहे.

 

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांमध्ये 5 डिसेंबर रोजी बैठक झाली. ही बैठक मुंबईतील ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये दीड तास दोघांमध्ये बैठक झाली होती. ठाकरे आणि आंबेडकर या दोन्ही नेत्यांमधील ती पहिली बैठक होती. ठाकरे आणि आंबेडकर हे आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातील इत महापालिका निवडणुकीत ठाकरे-आंबेडकरांची युतीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. यासंदर्भात अद्यापही दोन्ही नेत्यांकडून अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमी मुख्यमंत्री आणि आंबेडकर यांची आज मंत्रालयातील बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

आंबेडकर आणि ठाकरे यांच्या बैठकीत ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत तर वंचित बहूजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे उपस्तित होते.

संबंधित बातम्या

ठाकरे-आंबेडकरांमध्ये दीड तास बैठक; आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूनम महाजन यांनी चूक मान्य करावी, अन्यथा त्यांच्या प्रचारसभेत युवासेना सहभागी होणार नाही !

News Desk

संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

Aprna

प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार दाखल

News Desk