HW News Marathi
राजकारण

ठाकरे-आंबेडकरांमध्ये दीड तास बैठक; आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा ?

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या युतीसंदर्भात बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोघांमध्ये मुंबईतील आज (5 डिसेंबर) ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये (Grand Hyatt Hotel) बैठक सुरू आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये दीड तासांपासून बैठक पार पडली. वंचित आघाडीही महाविकास आघाडीचा एक भाग होणार असल्याची माहिती माध्यमांतून मिळत आहे.

दरम्यान, ठाकरे गट आणि आंबेडकर या दोन्ही नेत्यांमधील पहिली बैठक असल्याची माहिती माध्यमातून येत आहे.  या बैठकीदरम्यान मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महापालिका निवडणुकीत ठाकरे गट-आंबेडकरांची युती होण्याची शक्यता माध्यमातून अशा बातम्या येत आहे.

या बैठकीत उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत उपस्थिती होते. तर वंचित बहूजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे देखील बैठकीत उपस्थित होते. ग्रॅन्ड हयातमध्ये बैठक होण्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि वंचित शिष्टमंडळाची दोन वेळा बैठक झाली होती. या बैठकीनंतर आज ठाकरे आणि आंबेडकरांमध्ये बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीत युती आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा माध्यमातून आहेत.

 

 

 

Related posts

“विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाची 3 मते 21 कोटी रुपये मते फुटली,” मिटकरींचा खळबळजन आरोप

Aprna

‘हम तुम एक कमरे में बंद’, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर उद्धव ठाकरेंची टीका

Aprna

शिवसेनेच्या 12 खासदारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री सायंकाळी घेणार पत्रकार परिषद

Aprna